एम . ए . मराठी अभ्यासक्रम
मराठी विषयातील मास्टर ऑफ आर्टस हा दोन वर्षाचा अभ्यासक्रम आहे .ज्यात मराठी साहित्य,भाषाभ्यास व रोजगार निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या घटकांचा समावेश करण्यात आलेला आहे .या विषयाच्या अभ्यासातून भविष्यात सहजपणे रोजगार मिळू शकतो .आजचा आणि उद्याचा काळ समोर ठेऊन मराठी विषयाच्या अभ्यासक्रमात त्याअनुषंगाने काही महत्त्वाचे बदल केले आहेत. मराठी विषयात एम .ए .केले म्हणजे नोकरी मिळणार नाही,ही मानसीकता बदलविण्याचा महात्मा गांधी मिशन विद्यापीठाचा हा मनःपूर्वक प्रयत्न होय .कथा,कादंबऱ्या वाचून हाताला काम मिळत नाही ;परंतु ह्याच कथा,कादंबऱ्याचा सिनेमा कसा होऊ शकतो,याचा अभ्यास केल्यावर विद्यार्थ्यांना कला क्षेत्रात उत्तम करिअर करण्याची संधी एमजीएम विद्यापीठ आपणास उपलब्ध करून देत आहे .याशिवाय संशोधक, अनुवादक,वृत्तनिवेदक,सर्जनशील कलावंत आणि आजच्या जाहिरातीच्या युगात काही सेकंदाच्या जाहिरात लेखनाने लाखो रूपये कमविण्यासाठी स्वतःला सिद्ध करण्याची ही एक उत्तम संधी होय.
पात्रता व प्रवेश प्रक्रिया
- विद्यार्थी मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा.
- विद्यार्थ्याने किमान 50 टक्के किंवा समकक्ष श्रेणी मिळविलेली पाहिजे.
- मराठी भाषा नीटपणे वाचता व समजली पाहिजे.
- गुणवत्तेच्या आधारावर थेट प्रवेश मिळू शकेल.
- प्रवेश प्रक्रिया सुरू आहे.
- शुल्क: 10,000 प्रति वर्ष.
महत्त्वाची वैशिष्टे
- एलअोसीएफ अभ्यासक्रम .
- विषयकेंद्रीत आणि कौशल्यभिमुख शिक्षण.
- आंतराष्ट्रीय व राष्ट्रीय चर्चासत्रे,परिसंवाद आणि माहितीपूर्ण कार्यशाळा .
- प्रख्यात कवी,लेखकांशी संवाद,गप्पाटप्पा व मुलाखतीची सधी .
- ‘लेखक आपल्या भेटीला ‘वाड्ःमयीन उपक्रमाचे आयोजन .
- एमजीएम कम्युनिटी रेडिअो व सुसज्ज सिनेमा स्टुडिअो उपलब्ध .
अभ्यासक्रमाची रचना
- संहिता लेखन,गीतलेखन,मुद्रितशोधन कसे करावे याचे परिपूर्ण मार्गदर्शन .
- वृत्तनिवेदन,सूत्रसंचालन,संभाषण कौशल्य,जाहिरात लेखन,परीक्षण लेखनाविषयी कार्यशाळा.
- मुलाखत कशी घ्यावी याचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण.
- कथा व कादंबरीतून चित्रपट चित्रपट निर्मितीसाठी तज्ज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन.
- मराठी विषयातून रोजगाराच्या संधी याविषयी परिपूर्ण माहिती /मार्गदर्शन
रोजगाराच्या संधी
- प्राध्यापक
- शासकीय भाषा संचानालयात नोकरीची संधी
- अनुवादक
- जाहिरात/संहितालेखक
- वृत्तनिवेदक
- सूत्रसंचालन/निवेदन क्षेत्रात संधी
- वाड्ःमयीन परीक्षण लेखक
- मुद्रितशोधक
- मुलाखतकार
- सिनेमा लेखक