एमजीएममध्ये बायो मेडीकलच्या विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण यशस्वीपणे संपन्न
महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेले ‘बायो मेडिकल अप्लिकेशन्स इन रिवर्स इंजिनियरिंग फॉर इम्प्लांट स्टडीज’ या विषयावरील प्रशिक्षण यशस्वीपणे संपन्न झाले.
या एक महिना चाललेल्या प्रशिक्षण वर्गामध्ये बायो मेडिकलच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या प्रशिक्षण कालावधी दरम्यान विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षपणे मानवाच्या हाडाचा ‘हेकसागॉन आर्म ८३’ या ३ डी स्कॅनरचा वापर करून अभ्यास केला. विशेषत: मानवी हाडाचे स्कॅनिंग करून ३ डी प्रिंटिंगच्या सहाय्याने त्याची प्रतिमा तयार करण्यात विद्यार्थी यशस्वी झाले. याचा वापर ३ डी प्रिंटिंग आणि आर्टिफिशियल बोन स्टडीजसाठी होणार आहे. प्रशिक्षण कालावधीत विद्यार्थ्यांना प्रा.एमडी अजहर बारगीर यांनी मार्गदर्शन केले.
विद्यापीठात संपन्न झालेले हे प्रशिक्षण कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, कुलसचिव डॉ.आशिष गाडेकर, प्राचार्य डॉ.एच.एच.शिंदे, विभागप्रमुख डॉ.एम.एस.कदम व आयआयआरसी प्रमुख डॉ.एन.जी.फाफट यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे संपन्न झाले.

