एमजीएममध्ये संगीत व नाट्य कार्यशाळा यशस्वीपणे संपन्न
कला ही माणसाच्या जीवनात महत्वपूर्ण भूमिका निभावत असते. विशेषतः कलेची साधना आणि शिक्षण आजीवन सुरू राहणारी प्रक्रिया असल्याचे प्रतिपादन महात्मा गांधी मिशन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.विलास सपकाळ यांनी यावेळी केले.
महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सच्या वतीने आयोजित संगीत व नाट्य प्रशिक्षण कार्यशाळेचा समारोप समारंभ मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यापीठाच्या रुक्मिणी सभागृहात संपन्न झाला. या समारोप सोहळ्यास कुलसचिव डॉ.आशिष गाडेकर, स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सचे प्रमुख प्रा.डॉ.राजू सोनवणे व सर्व संबंधित उपस्थित होते.
श्री. सपकाळ म्हणाले, महात्मा गांधी मिशन विद्यापीठ कायम नवनवीन उपक्रम राबवत असते. संगीत व नाट्य कार्यशाळा या उपक्रमाच्या माध्यमातून या क्षेत्राची आवड असणाऱ्या सर्वांना एक संधी विद्यापीठाने उपलब्ध करून दिली आहे. अशा प्रकारचे उपक्रम वर्षभर राबविले जात असतात.
समारोप सोहळ्याची सुरूवात स्वागत गीताने करण्यात आली. त्यानंतर शिबिरार्थींना सहभाग प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले…यावेळी सहभागी शिबिरार्थींनी समुहगायन, वाद्यवादन, विडंबन नाट्य, मुकाभिनय ई.विविध कलांचे सादरीकरण केले. यावेळी राहुल खरे, सतीश जोगदंड, शिबिरार्थी, रसिकश्रोते व सर्व संबंधित उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी विनोद पवार, किरण साखळे, बाबू गडलिंग, गजानन वारे आदींनी परिश्रम घेतले.