IT and AIML Engineering-The Right Choice
– डॉ. शर्वरी चंद्रशेखर तामणे
प्राध्यापक व विभाग प्रमुख, यूडीआयसीटी, एम जी एम विद्यापीठ
युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्फोर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नोलॉजी (यूडीआयसीटी) ही जवाहरलाल नेहरू इंजिनीअरिंग कॉलेजची (एमजीएम विद्यापीठ) ची उपशाखा असून येथील अत्याधुनिक बी.टेक. अभ्याक्रम विद्यार्थ्यांना इन्फोर्मेशन टेक्नोलॉजी (आयटी) क्षेत्रात उज्ज्वल भवितव्य घडविण्याची अप्रतिम संधी देतो. अभियांत्रिकी क्षेत्रात निर्विवाद वर्चस्व असलेल्या आयटी शाखेची लोकप्रियता दिवसागणिक वाढते आहे. याचे मुख्य कारण म्हणजे आयटीच्या विद्यार्थ्यांना सर्वच क्षेत्रात असलेली प्रचंड मागणी. आर्टीफिशयल इंटेलिजन्स (AI) आणि मशीन लर्निंगच्या (ML) उदयानंतर तर जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आयटीचा शिरकाव होणार असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. यामुळे भविष्यात बी. टेक. माहिती तंत्रज्ञान (आयटी) व AIML अभियंत्यांची गरज वाढणार आहे यात शंका नाही. या लेखातून आपण आयटी म्हणजे नेमके काय, त्याची व्याप्ती आणि महत्त्व समजून घेऊया.
“माहिती तंत्रज्ञान” अर्थात आयटी – म्हणजे काय?
आज आयटी हा शिक्षणक्षेत्रातील परवलीचा शब्द बनला आहे. परंतु हे क्षेत्र म्हणजे नेमके काय आहे याची माहिती खूप कमी जणांना आहे. एवढेच काय, पण अगदी जेष्ठ अभियंते आणि शिक्षकांना सुद्धा आयटी आणि संगणक यांतील फरक नेमका माहिती नसतो. सामान्य माणसाच्या शब्दात, हा एक अभ्यास आहे ज्यामध्ये संगणक प्रणालींचा वापर (प्रॅक्टिकल) समाविष्ट आहे. कदाचित म्हणूनच आयटी हा शब्द सामान्य माणसासाठी संगणक आणि त्यांच्या नेटवर्कसाठी प्रतिशब्द म्हणून वापरला जातो. परंतु त्यात टीव्ही आणि स्मार्टफोनसारख्या इतर माहिती वितरण तंत्रज्ञानाचाही समावेश होतो हे समजून घ्यायला हवे. मुळात, आयटीमध्ये संगणकीय तंत्रज्ञानाशी संबंधित सर्वच गोष्टींचा समावेश होतो. मोठ्या किंवा लहान व्यवसायात माहिती तंत्रज्ञानाचा वापर आपल्या दैनंदिन आयुष्यात मोलाची भूमिका बजावतो आहे. व्यवसायांमध्ये आयटीच्या वापराचे तीन मुख्य प्रकार आहेत: १) मूलभूत माहिती संकलन आणि व्यवस्थापन प्रक्रियेस मदत करणे (डेटा मॅनेजमेंट) २) निर्णय प्रक्रियेत मदत करणे (बिग डेटा आणि डेटा अनॅलिटिक्स) आणि ३) नाविन्यास चालना देणे (AI/ML).
उदाहरणार्थ, जेव्हा माहिती प्रक्रियेचा विचार केला जातो तेव्हा आयटीचा उपयोग संगणकीय आणि मुद्रण पेरोलपासून ते सादरीकरणे तयार करण्यापर्यंतची कार्ये सुगम करण्यासाठी केला जातो. आयटीचा उपयोग उत्पादने आणि सेवांसाठी वेबसाइट तयार करण्यासाठी देखील केला जाऊ शकतो. आयटी अभियंता AI अंतर्गत ही उत्पादने तसेच सेवा योग्य व्यक्तिपर्यंत अचूक पोहचवू शकतो आणि म्हणूनच आयटी क्षेत्रात तज्ञांना प्रचंड मागणी असते.
निर्णय प्रक्रियेत आयटीचा वापर मेट्रिक्स समजून घेण्यासाठी केला जाऊ शकतो. उदा. ज्या ग्राहकांकडे कर्ज थकीत खाती आहेत (बॅंक लोन डीफोल्टर) किंवा ऑनलाइन ग्राहक शॉपिंग कार्ट पैसे न भरता सोडत असेल, तेव्हा त्या मागचे कारण मेट्रिक्स द्वारे (बिग डेटा आणि डेटा अनॅलिटिक्स) समजून घेतले जाऊ शकते.
आयटीचे ज्ञान कामाच्या ठिकाणी नवनवीन विषयांवर सतत संशोधनास चालना देते. इंटरनेट हे साधन माहिती तंत्रज्ञानाचा महत्त्वपूर्ण पैलू आहे हे सत्य आता स्वीकारलंच पाहीजे. AI आणि Machine Learning नी जो इतिहास रचला आहे ते तर आपण बघतोच आहे. अजून खुप काही करण्यासारखे आहे कारण AR (Augmented Reality) and VR (Virtual Reality) हे जगाचे भविष्य आहे. मग फ्युचर रेडी अभ्यास क्रम निवडणेच बरोबर, नाही का?
आयटी या क्षेत्राची निवड करण्यासाठी विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिक डेटाचे विविध प्रकार आणि त्यातील सुरक्षिततेची देवाणघेवाण करण्याशिवाय पायाभूत सुविधा, विकास, संग्रहण, प्रक्रिया आणि डिव्हाइसचे नेटवर्किंग यासारख्या बर्याच गोष्टीं शिकविल्या जातात. आयटी अभियंत्याना संगणक आणि इलेक्ट्रॉनिक्सच्या मूलभूत संकल्पना शिकवल्या जातात.
परदेशाचे मार्ग उघडल्यामुळे माहिती तंत्रज्ञान केवळ विद्यार्थ्यांसाठीच नाही तर त्यांच्या पालकांसाठीदेखील पहिली पसंती बनली आहे. आयटीची ही लोकप्रियता सामान्य माणसाचे जीवन सुधारण्याच्या क्षमतेमुळेही वाढली आहे. स्मार्ट लाइफचा अर्थ माहिती तंत्रज्ञानाधारे मानवजातीचे आयुष्य सोपे, आणि सुलभ करणे हा आहे. स्मार्ट आरोग्य उपकरणांच्या मदतीने आपण व्यस्त वेळापत्रकातही आपल्या आरोग्याबद्दल सतर्क राहू शकतो आणि योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकतो. स्मार्ट डिव्हाइसमुळे शरीराच्या आत किंवा बाहेरून आरोग्याचे महत्त्वपूर्ण निदर्शक नोंदवता येऊ शकतात. उदा. हृदयाचा ठोकाव्याचा मागोवा घेणे, चालताना पाऊले आणि कॅलरी मोजणे इत्यादींची नोंद ठेवणे.
तंत्रज्ञानामुळे लोकांचे दररोजचे जीवन जगण्याची पद्धत बदलली आहे. आपण दररोजची कामे कशी करता ही कामे करताना आपल्याला काय अडचणी येतात यावर लक्ष ठेऊन हीच कामे अजून अचूक आणि कमी वेळात करून घेण्याची संपूर्ण जबाबदारी आयटी तंत्रज्ञान घेते आणि आपले दररोजचे काम सुकर बनवते. तंत्रज्ञानामुळे, आता कामावर जाणे किंवा घरातील कामे करणे खूप सोपे झाले आहे.
छोटा किंवा मोठा व्यवसाय असो, आयटीने, व्यवस्थापकांना आणि कामगारांना त्यांची उत्पादनक्षमता आणि उत्पादन सुधारण्यासाठी अधिक कार्यक्षम व्यवस्थापनात मदत केली आहे. माहिती तंत्रज्ञानाची उत्कृष्ट भूमिका मल्टी-नॅशनल कॉर्पोरेशन्स, छोटे-मोठे व्यवसाय, डेटा व्यवस्थापन, इ. सारख्या कामांसाठी उपयुक्त आहे.
माहिती तंत्रज्ञान अभ्यासक्रमांचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांना सैद्धांतिक ज्ञानासह व्यावहारिक (प्रॅक्टीकल) अनुभव आणि आयटी कंपन्यांची आवश्यकता पूर्ण करणारे कौशल्य प्रदान करणे हे आहे. सॉफ्टवेअर डिझाईन करणे, विकसित करणे किंवा सॉफ्टवेअरची चाचणी करणे, या सर्व गोष्टी आयटी अभ्यासक्रमांचा एक छोटासा भाग आहेत. आयटीची व्याप्ती त्याहून फार जास्त आहे.
रोजगाराच्या आव्हानांना तोंड देत विद्यार्थ्यांना असंख्य करिअरच्या संधी उघडणाऱ्या प्रवाहाची निवड करणे अपरिहार्य आहे. इंजीनियरिंगमधील माहिती तंत्रज्ञान हे असेच एक क्षेत्र आहे जे चमकत्या भविष्यासाठी मार्ग तयार करते. आयटी, एखाद्याची क्षमता आणि ओळख विकसित करण्यात मदत करते. चांगले संवाद कौशल्य, आयटी इंडस्ट्रीत आपले ज्ञान सुधारण्यासाठी नवीन कल्पना आणि उत्कटतेसह उत्सुकता यासारखे गुण असलेले कोणीही आपल्या करिअरमधील सर्वोत्कृष्ट गोष्टींची अपेक्षा करू शकते. या क्षेत्राचा सर्वात मनोरंजक भाग म्हणजे एंट्री-लेव्हल आणि तज्ज्ञ अशा दोन्ही स्तरावर नोकरीच्या पर्यायांची कमतरता नाही, कारण आयटी क्षेत्र वेगाने विस्तारत आहे. आयटीमध्ये बी-टेक पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी जवळजवळ सर्व प्रमुख मल्टीनेशनल कॉर्पोरेशन (एमएनसी) जसे की आयबीएम, मायक्रोसॉफ्ट, सिस्को, टीसीएस, इन्फोसिस इत्यादी येथे नोकरी करू शकतात.
सध्याची लॉकडाऊन आणि करोनानंतरची परिस्थिति बघता ई-कॉमर्स आणि ऑनलाइन मार्केटिंग खूपच लोकप्रिय होते आहे मग अशा परिस्थितीत आयटी अभियंता बनून इंडस्ट्री-रेडी होण्यातच शहाणपण नाही का? की दुसऱ्या शाखेचा अभियंता होऊन आयटी मध्ये PG डिप्लोमा करून नोकरी मिळवणे योग्य आहे? निर्णय आपल्याला घ्यायचा आहे. आयटीतील पदवी ही नक्कीच ‘स्मार्ट चोइस’ ठरेल यात शंका नाही!
आयटी हा एक असा प्रवाह आहे जो एखाद्याच्या जीवनात निःसंशयपणे सकारात्मक बदल घडवू शकतो. या प्रवाहात पात्र विद्यार्थ्यांसाठी नोकरीची कोणतीही कमतरता नाही. तथापि, विद्यार्थ्यांची क्षमता त्यांच्या कारकीर्दीत यशस्वी होण्यास महत्त्वपूर्ण भूमिका बजावते हे सत्य स्वीकारले पाहिजे. वेतन पॅकेजेस देखील क्षेत्रातील एखाद्या व्यक्तीच्या क्षमता आणि अनुभवावर अवलंबून असतात. हे सांगणे अतिश्योक्ती ठरणार नाही की जेव्हा एखादा विद्यार्थी एम जीएम विद्यापीठातील यूडीआयसीटीमध्ये माहिती तंत्रज्ञान अभियांत्रिकीचा अभ्यास करण्यासाठी सामील होइल, तेव्हा त्याला किंवा तिला करिअरच्या उत्तम संधी मिळवल्या असे गर्वाने सांगता येईल. मराठवाड्यामधील सर्वोत्कृष्ट विद्यापीठात यूडीआयसीटी विभागाचा समावेश होतो. तेव्हा आजच संपर्क साधा आणि उज्ज्वल भविष्याचा दरवाजा अनलॉक करा. अभ्यास आणि भरभराटीचे करिअर घडवण्यासाठी जगभरातील सर्व विद्यार्थ्यांचे येथे स्वागत आहे.
आयटी अभियांत्रिकी अभ्यासक्रम, कार्यक्षेत्र, नोकरीच्या विविध संधी:
अभ्यासक्रम:
आयटी (माहिती तंत्रज्ञान) ही CSE शाखेच्या तुलनेत नवीन अभियांत्रिकी शाखा आहे. उशीरा एन्ट्री असूनही, ती विद्यार्थ्यांमध्ये अतिशय लोकप्रिय झाली आहे आणि चांगल्या वेतन पॅकेजेससह असंख्य रोजगाराच्या संधी निर्माण विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत आहे.
ज्या विद्यार्थ्यांना वेब आणि इंटरनेट तंत्रज्ञान तसेच डेटाबेस व्यवस्थापनाची आवड आहे त्यांना हा अभ्यासक्रम उपयोगी पडु शकतो. B.Tech. माहिती तंत्रज्ञानाचा अभ्यासक्रम 4 वर्षाच्या कालावधीमध्ये (अथवा 8 सेमिस्टर मध्ये) विभागला गेला आहे, प्रत्येक सेमिस्टर हा 6 महिन्यांचा असतो. प्रत्येक सेमिस्टर दरम्यान विद्यार्थ्यांना विविध विषयांचा (Theory आणी Practical चा) अभ्यास करावा लागतो.
एमजीएम विद्यापीठाच्या यूडीआयसीटी विभागाच्या बी. टेक. आयटी (माहिती तंत्रज्ञान) शाखेमध्ये प्रामुख्याने Big Data Analytics (BDA), Blockchain आणी IoT तसेच डेटाबेस मॅनेजमेन्ट सिस्टम, जावा प्रोग्रामिंग, माहिती सुरक्षा, अल्गोरिदमचे विश्लेषण, संगणक नेटवर्किंग, ईआरपी, क्लाऊड कंप्यूटिंग, सॉफ्टवेअर इत्यादी विषयांचा समावेश आहे. थोडक्यात, विद्यार्थ्यांना बी. टेक. आयटी तज्ञ होण्यासाठी वरील विषयात प्रशिक्षण घेणे आणि त्यांचे कौशल्य विविध applications साठी उपयोगात आणणे हे आहे. त्याबरोबरच ते applications कसे वापरायचे आणी वापरताना काही problem आलाच तर तो कसा solve करायचा हे आहे.
तिसर्या सेमिस्टरनंतर आयटी आणि त्यामधील विविध उपशाखा (BDA/Blockchain/IoT) यावर लक्ष केंद्रित करणारे विषय शिकविले जातात. काही विषय विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडी प्रमाणे ही निवडता येतात. ज्यांची उपलब्धता एका संस्थेतून दुसर्या संस्थेतही बदलू शकते. जसे की, एखाद्या विद्यार्थ्याला film Art ह्या course मध्ये interest असेल तर त्याला तो course MGM College of Journalism and Mass Communication मधून करता येऊ शकतो. अंतिम आणि पूर्व अंतिम वर्षात, औद्योगिक प्रशिक्षण आणि प्रकल्प कार्य महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.
पात्रता:
10+2 सायन्सचे फिजिक्स, रसायनशास्त्र आणि गणित हे विषय असलेले विद्यार्थी, ज्यांनी मान्यताप्राप्त मंडळामधून 12वी बोर्ड परीक्षा उत्तीर्ण केली आहे ते बी.टेक. आयटी अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासाठी पात्र आहेत.
प्रवेश प्रक्रियेत भाग घेण्यासाठी पात्र ठरणार्या विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय प्रवेश परीक्षेस अथवा जेईई मेन, अथवा एमएचटी सीईटी अथवा MGMU–CET 2021 देणे आवश्यक आहे.
आयटी इंजिनिअर झाल्यानंतरच्या व्यवसायाच्या व इतर संधी:
आयटी इंजिनिअर झाल्यानंतर तुम्हाला उच्च शिक्षणासाठी (PG/Ph. D) भारतात तसेच अमेरिका, युरोप, ई. देशात खूप संधी उपलब्ध आहेत. तुम्ही शिक्षण क्षेत्रात पण कार्यरत होऊ शकता. अभियांत्रिकी महाविद्यालयात व्याख्याता/प्राध्यापक, तसेच खासगी क्षेत्रात व सरकारी कार्यालयात पण तुम्हाला खूप संधी आहेत, जसं की, अनुसंधान संस्था, बीएसएनएल, CDAC, इस्रो, डीआरडीओ, एएआय, लोक सेवा आयोग ई.
बहुराष्ट्रीय कंपन्यामध्ये कॉर्पोरेट ट्रेनर व Technical Instructor म्हणूनही तुम्ही सेवा देऊ शकता. भारतीय वायू सेनेत Fighter Pilot, Aircraft Maintenance Engineer, Technical Ground Staff तसेच हवाई दळणवळण क्षेत्रात विविध संधी मिळू शकतात.
रिसर्च अँड डेव्हलपमेंट क्षेत्रामध्ये, खासगी, तसेच सरकारी संस्थामध्ये आर्टीफिशयल इंटेलिजन्स, मशीन लर्निग, बिग डेटा व हाय परफॉरमन्स कॉमप्यूटींग या क्षेत्रात उत्कृष्ट करीअर संधी उपलब्ध आहेत.
क्वॉलिटी कंट्रोल आणि टेस्टिंग क्षेत्रात सोफ्टवेअर टेस्टिंग इंजीनीअर, क्वॉलिटी कंट्रोल इंजीनीअर, Quality Assurance Analyst, बिग डेटा Quality Assurance टेस्टिंग, वेब App टेस्टिंग, Mobile App टेस्टिंग ई. संधी उपलब्ध आहेत.
आजकाल आयटी क्षेत्र इतके चांगले विकसित झाले आहे. ते इतर उद्योगांच्या कामांवरही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे परिणाम करीत आहे. ज्या आयटी अभियंताना स्वःताच्या कामाचा ठसा उमटवायचा आहे, अशांसाठी Startup तसेच Entrepreneurshipच्या विविध संधी उपलब्ध आहेत. कारण प्रत्येक क्षेत्रामध्ये कॉम्पुटर Application, Software किंवा Hardware Application बनविण्यासाठी विविध संधी उपलब्ध होऊ शकतात. आयटी क्षेत्र हेल्थकेअर, एव्हिएशन, एज्युकेशन, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर, टेलिकम्युनिकेशन सेक्टर, सरकारचे विविध उपक्रम आणि विभाग इत्यादी विविध क्षेत्रांसाठी सुद्धा सहाय्यक व्यक्ती म्हणून काम करु शकते.
आयटी अभियंता हा एक उत्कृष्ट शैक्षणिक पाया बनू शकतो व तिथून आपल्या आवडत्या क्षेत्रामध्ये असंख्य संधी उपलब्ध होऊ शकतात. स्टार्टअप परिस्थितीत प्रतिभावान आयटी व्यावसायिकांचीही भरती होते. तर, जे लोक सर्जनशील आणि आव्हानात्मक कामाच्या वातावरणाची अपेक्षा करीत आहेत त्यांना स्टार्टअप क्षेत्रात नोकरी मिळू शकते. एखादी व्यक्ती आयटी कौशल्यांचा वापर करू शकते आणि स्वत: चे उद्योग किंवा कन्सल्टन्सी फर्म देखील सुरू करू शकते. परंतु सल्लागाराचा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रथम कामाचा चांगला अनुभव घ्यावा लागतो.