MGM University Celebrating India's Rich Artistic Heritage
State Co-operation Minister, Atul Save to inaugurate the Fair
MGM University is all set to present a unique ‘Art & Craft Fair’, a three-day extravaganza celebrating the diverse artistic traditions of India. Taking place from 26 to 28 May 2023, this one-of-a-kind event will feature the participation of renowned artists from every corner of the country, promising an enchanting experience for art enthusiasts and the general public alike.
Hosted by the esteemed Faculty of Design of MGM University, the Art & Craft Fair will be open for all from May 26, 2023, at 4.00 PM. The official inauguration will take place at the hands of the Maharashtra State Cooperative Minister, Atul Save on May 27, 2023, at 11 AM. A vibrant platform for the artists, painters, sculptors, and crafts artisans to come together to showcase their creativity and talent, the event will provide the visitors with a rare opportunity to witness live demonstrations of art creation and interact directly with the artists behind these magnificent works.
Speaking about the event, Dr Monika Aggarwal, Dean of the Faculty of Design at MGM University said that we are thrilled to host the Art & Craft Fair, where art enthusiasts can immerse themselves in the vibrant tapestry of India’s artistic heritage. It is a celebration of our country’s rich cultural legacy and a platform to promote and support our talented artists.
The event will not only mesmerize attendees with its captivating displays but will also serve as a launching pad for the university’s own students to exhibit their artistic prowess. This provides a fantastic opportunity for the students to network, explore potential career paths, and receive recognition for their exceptional skills.
The fair will feature an impressive lineup of renowned artists, including the likes of L.M. Gadge, B.S.Chavan, Neena Sharma, Abdul Halim, Kajal Kamble, Ambadas Virbhadra Nakka, Babita Pawar, Shubhangi Dhananjay, Sudhirbhai Chitara, Rekhaben Chitara, Chandrakant Kale, Varsha S Kamble, Ranjana Choudhary, Rahamat Bano, Rakesh M. Dhalkari, Fahim Ahmad Gulam. Their breathtaking creations will showcase a myriad of art forms, ranging from traditional to contemporary, highlighting the immense talent and creativity that exists within our nation.
Open to All
This event will be open to the public free of cost, allowing everyone to experience the magic of Indian art and crafts. Visitors will have the opportunity to purchase unique artworks directly from the artists, providing support and encouragement to the thriving Indian art community.
Join us at MGM University from 26 to 28 May 2023 and be a part of this spectacular celebration of India’s artistic excellence.
देशभरातील कलाकार एमजीएमच्या क्राफ्ट मेळाव्यात होणार सहभागी
राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते होणार मेळाव्याचे उद्घाटन
महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या फॅकल्टी ऑफ डिझाईनच्या वतीने तीन दिवसीय क्राफ्ट मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या तीन दिवसीय मेळाव्यात देशभरातील नामवंत कलाकार सहभागी होणार आहेत. या मेळाव्यात सहभागी झालेले कलाकार आपली कला सादर करीत उपस्थितांना मार्गदर्शन करणार असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. मोनिका अग्रवाल यांनी यावेळी दिली.
श्रीमती अग्रवाल म्हणाल्या, शुक्रवार दिनांक २६ मे २०२३ रोजी दुपारी ४ वाजल्यापासून हा मेळावा सर्वांसाठी खुला असणार असून शनिवार, दिनांक २७ मे २०२३ रोजी सकाळी ११ वाजता या मेळाव्याचे उद्घाटन राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर व सर्व संबंधित उपस्थित राहणार आहेत. हा मेळावा विद्यापीठाच्या परिसरात दिनांक २६, २७ व २८ मे असे तीन दिवस चालणार आहे.
या मेळाव्यासाठी सर्वांना प्रवेश खुला आहे. या मेळाव्यात राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कलाकार आपला सहभाग नोंदविणार आहेत. यामध्ये गणेश बरूड, विक्रम वाकले, सिद्धार्थ जाधव, मृणाल बंडकर, अभिषेक निवेलकर, अनिकेत गुजारे, सन्नी साठे, अजिंक्य जेडीयाल, आदर्श फराणे, शेखर साळुंके, पीयूष घुमाटकर, शादाब काझी, सचिन बने, तुषार कुंभारे, सिद्धेश राऊत, अजित राऊत, विवेक पहादन, आश्विन खापरे, एल. एम. गाडगे, बी. एस. चव्हाण, निना शर्मा, अब्दुल हालीम,काजल कांबळे यांचा समावेश असणार आहे. तसेच या मेळाव्यात विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचा सहभाग असणार आहे. विशेषत: विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक मूल्य रुजावित म्हणून विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन यामध्ये असणार आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपली कला सादर करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. यामध्ये सर्व अभ्यासक्रमांचे विद्यार्थी आपला सहभाग नोंदवत असल्याची माहिती श्रीमती अग्रवाल यांनी दिली.
श्रीमती अग्रवाल म्हणाल्या, एमजीएमचा हा क्राफ्ट मेळावा नावीन्यपूर्ण असून यामध्ये विविध स्पर्धांचे आयोजनही करण्यात आलेले आहे. यामध्ये हँडमेड पेपरमध्ये स्टेशनरी, प्रॉडक्ट, पेंटिंग इ. समावेश असणार आहे. या मेळाव्यात खादीचेही एक दालन असणार आहे. या मेळाव्याचे आणखी एक वैशिष्ट म्हणजे यामध्ये सर्व कलांचे कलाकार प्रत्यक्षपणे सादरीकरण करणार आहेत. उपस्थितांच्या समोर प्रत्यक्षपणे वस्तु बनणार असून त्या तत्काळ विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
गांधीजींच्या विचारांवर आधारित आणि भारतीय कला व वारसा यांचा समावेश असणाऱ्या कलाकृती या क्राफ्ट सोहळ्यात कलाप्रेमींना पाहण्यास मिळणार आहेत. अशा या आगळ्यावेगळ्या आणि नावीन्यपूर्ण मेळाव्यात सर्व कलाप्रेमी रसिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन श्रीमती अग्रवाल यांनी यावेळी केले.
