150 JNEC students are selected in renowned companies in 2022-23
A proud moment for MGM University! Over 150 students of our Jawaharlal Nehru Engineering College got placed in various renowned companies through campus interviews with annual packages ranging between 3 LPA to 7.5 LPA. The companies include Goldman Sachs, AFour Technologies, Atlas Copco, Hexaware, Virtusa, Cognizant, Tata Elxsi, Jio Platform, Dassault Systèmes, Endurance Group, Skoda Auto and others. Heartiest congratulations to all the selected candidates.

एमजीएम विद्यापीठाच्या जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या १५० विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड
२०२२-23 या शैक्षणिक वर्षात परिसर मुलाखती अंतर्गत जेएनईसीच्या अंतिम वर्षातील एकूण १५० हुन अधिक विद्यार्थ्यांची विविध नामांकीत कंपन्यांमध्ये निवड झाली असून त्यांना साधारण 3 ते ७.5 लाखांच्या दरम्यान वेतन देण्यात येणार आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये जेएनईसीच्या मेकॅनिकल, कॉम्प्युटर सायन्स, आयटी, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, केमिकल आणि एमसीए या विद्याशाखांतील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. परिसर मुलाखतीसाठी जेएनईसीमध्ये आलेल्या कंपन्यांमध्ये गोल्डमन सॅक, अ फोर टेक्नॉलॉजीज, अॅटलास कॉपको, हेक्झावेअर, विर्तुसा, कॉग्नीजंट टेक्नॉलॉजीज, टाटा एलक्सी, जिओ प्लॅटफॉर्म, चुबी ट्रेडर्स, डसॉल्ट सिस्टम, फोसेको इंडिया लिमिटेड, इंड्यूरंस ग्रुप, स्कोडा ऑटो यासारख्या आयटी, टेक्नॉलॉजी, टेलिकॉम, मेकॅनिकल इत्यादी क्षेत्रांतील नामांकित कंपन्यांचा समावेश आहे, असे ट्रैनिंग अँड प्लेसमेंट विभाग प्रमुख डॉ. परमिंदर कौर धिंग्रा यांनी सांगितले.
परिसर मुलाखतीच्या यशस्वीतेसाठी डॉ. परमिंदर कौर धिंग्रा तसेच विभागीय समन्वयक प्रा. मोहसीन अन्सारी, प्रा. अरिफ पठाण, प्रा. सुमेध जाधव, प्रा. विनोद अग्रवाल, प्रा. सुधीर यादव, प्रा. वनिता हणमंते, प्रा. गणेश शिंगाडे, सौ. आरती राऊलवार व श्री मोईज शेख यांनी परिश्रम घेतले. निवड झालेल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे महात्मा गांधी मिशन विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, विश्वस्त प्रा. प्रतापराव बोराडे, एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर, प्राचार्य डॉ. हरिरंग शिंदे, उपप्राचार्या डॉ. विजया मुसांडे व सर्व विभागप्रमुखांनी कौतुक केले.