एमजीएम विद्यापीठातीलव्यवसायाभिमुख अभ्यासक्रमांत आपला प्रवेश निश्चित करा
औरंगाबाद: स्वयंअर्थसहायित राज्य विद्यापीठ म्हणून एमजीएम विद्यापीठाची स्थापना २०१९ साली झाली. असे असले तरी विद्यापीठाशी संलग्न बहुतांश महाविद्यालयांना जवळपास ३७ वर्षांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा आहे. एमजीएम विद्यापीठाची स्थापना ही राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या मुल्यांवर आधारित असून व्यवसायक यशाबरोबरच सामाजिक विकासात भर घालणारी पिढी घडविण्यावर विद्यापीठाचा भर आहे.व्यवसायाभिमुख आणि भविष्याभिमुख अभ्यासक्रम, जागतिक दर्जाच्या पायाभूत सोयी, अत्याधुनिक संशोधन सुविधा आणि अप्रतिम प्लेसमेंट रेकोर्ड या मोठ्याप्रमाणावर एमजीएम विद्यापीठाकडे विद्यार्थ्यांना आकर्षित करणाऱ्या काही गोष्टी आहेत.
एमजीएम विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी प्रवेशाला सुरुवात केली असून अभियांत्रिकी, माहितीतंत्रज्ञान, विज्ञान, कला,व्यवस्थापन आणि वाणिज्य, सामजिक शास्त्रे,ललित कला आणि प्रायोगिक कला या विषयांत पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश देण्यात येत आहे. या वर्षी विद्यापीठाने विद्यार्थ्यांना उज्ज्वल भवितव्याची हमी देणारे अनेक भविष्याभिमुख अभ्यासक्रम सुरु केले आहेत. उदा. आर्टिफ़िशिअल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग, ब्लॉकचेन, इंटरनेट ऑफ थिंग्ज, डेटा सायन्स, बायोसायन्स, स्टेम सेल, कॅन्सर बायोलॉजी आणि टिश्यू इंजिनिअरींग, फिल्म, फोटोग्राफी आणि डिजिटल मिडिया,जागतिक पत्रकारिता,इंटेरीअर डिझाईनिंग,फिनटेक इत्यादी.
एमजीएम विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी MGMU-CET 2021किंवा विशिष्ट राज्य अथवा राष्ट्रीय पातळीवरील प्रवेश परीक्षा देणे आवश्यक आहे.
एमजीएम विद्यापीठाची संपूर्ण प्रवेश प्रक्रियाखालीलप्रमाणे:
प्रवेश अर्ज कसा भरावा?
- विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जा: https://mgmu.ac.in/
- तुमच्या आवडी आणि पात्रतेनुसार अभियांत्रिकी किंवा इतर अभ्यासक्रम निवडा
- प्रवेश अर्जात आवश्यक ती माहिती भरा (वैयक्तिक व शैक्षणिक माहिती)
- प्रवेश परीक्षेसंबंधी माहिती भरा (अधिक तपशील पुढे देण्यात आला आहे)
- शैक्षणिक पात्रता, जात, स्थलांतर (मायग्रेशन), रहिवासी इत्यादी प्रमाणपत्रांच्यास्कॅन केलेल्या प्रती अपलोड करा
- प्रवेश अर्ज शुल्क रु. १००० भरा (एनइएफटी, क्रेडिट/डेबिट कार्ड, डिमांड ड्राफ्ट किंवा कॉलेज कॅश काऊंटरवर कॅश स्वरुपात)
- प्रवेश अर्ज सबमिट करून डाउनलोड करा.
- मेरीट लिस्ट जाहीर होण्याची वाट पहा
- प्रवेश प्रक्रिया पूर्ण करा आणि प्रवेश शुल्क भरा
अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठीची प्रवेश परीक्षा: एमजीएम विद्यापीठाच्या जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालयात आणि युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्फोर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नोलॉजी विभागातप्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी MGMU-CET 2021किंवा इतर विशिष्ट प्रवेश परीक्षा दिलेली असणे आवश्यक आहे.
अभियांत्रिकी प्रवेशासाठीची MGMU-CET 2021 परीक्षा ०८ ते १० जुलै २०२१ दरम्यान घेतली जाईल.
इतर सर्व गैर-अभियांत्रिकी अभ्यासक्रमांसाठीची प्रवेश परीक्षा: एमजीएम विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांत गैर-अभियांत्रिकी अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी विद्यापीठाची MGMU-CET 2021किंवा इतर विशिष्ट प्रवेश परीक्षा दिलेली असणे आवश्यक आहे.
या अभ्यासक्रमांसाठीची MGMU-CET 2021 परीक्षा दिनांक २२ जून २०२१ रोजी घेण्यात येईल.
MGMU-CET 2021 प्रवेश परीक्षेसाठी अर्ज कसा करावा
- पुढील लिंकवर जा: https://mgmu.ac.in/admissions/MGMU-CET.php
- तुमचा ईमेल, फोन नंबर, राज्य, शहर इत्यादी माहिती भरा
- आवश्यकतेनुसार पदवी किंवा पदव्युत्तर पदवी निवडा
- अभ्यासक्रम निवडा
- दिलेल्या जागेत कॅप्चा भरा
- सबमिट करा
यानंतर प्रवेश परीक्षा नोंदणी अर्ज २०२१ उघडेल
- मार्गदर्शक सूचना लक्षपूर्वक वाचा
- अर्जात विचारण्यात आलेली माहिती भरा
- MGMU-CET 2021 चे शुल्क रु. ९०० भरा
- अर्ज सबमिट करा
- तुमच्या नोंदणीकृत ईमेल आणि फोनवर प्रवेश परीक्षेसंबंधी सूचना येतील, त्याकडे लक्ष ठेवा
प्रवेशासंबंधी कोणत्याही प्रकारची मदत हवी असल्यास पुढील क्रमांकावर सुद्धा संपर्क साधता येईल: +91 9067612000.